मोठी बातमी : अवजड वाहनांसह खासगी बसचालकांचा बेमुदत संप ! इ चलन बंदसह कोणत्या मागण्या ?

  • Written By: Published:
मोठी बातमी : अवजड वाहनांसह खासगी बसचालकांचा बेमुदत संप ! इ चलन बंदसह कोणत्या मागण्या ?

Private bus drivers, heavy vehicles go on indefinite strike : अवजड वाहने, खासगी बस, शाळेचे बसचालक यांनी बेमुदत संपाचे हत्यार (Private bus drivers, heavy vehicles)उपासले आहेत. मंगळवारी मध्य रात्रीपासून हे वाहनचालक संपावर (strike) जाणार आहेत. त्यात वाहनचालकांचे मालकही सहभागी होणार आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनचालकही संपात असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे.


काँग्रेस पक्ष का सोडतायत ? कुणाल पाटलांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले

जेएनपीटी येथील 38 हजार कंटेनर वाहतूक चालक, एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकांचा संप आहे. इ चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय रद्द करावा, अशा मागण्या करण्यात आल्यात.

आता रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही, अ‍ॅडमिट झाल्यानंतर दररोज मिळणार पैसे, काय आहे हॉस्पिटल डेली कॅश स्कीम ?

या संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना बसणार आहे. मुलांच्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. त्याच हा संप होत आहे. तर आषाढी वारकरी गेले आहेत. वारकऱ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्यासाठी एसटीच्या बसेस सोडलेल्या आहेत. परंतु त्या अपुरा असतात. त्यावेळी खासगी बस, ट्रकद्वारे ही वारकरी घरी जातात.


या संघटनांचा बंदला पाठिंबा

भारताची सर्वात मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो, टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य अशा जवळपास सगळ्याच संघटनांच बंदला पाठिंबा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube