मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर… अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारी गायिका अंजली भारती नेमकी कोण?
Anjali Bharti ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबत एक अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
Who is singer Anjali Bharti, who made controversial statements about Amrita Fadnavis : देशासह राज्याच्या राजकारणामध्ये दररोज कुणी ना कुणी तरी राजकीय नेत्यांवर चिखलफेक करताना दिसून येत त्यात आता मात्र एका गायिकेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबत एक अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच आपण राजकारणाची पातळी एवढी खाली आणून ठेवली आहे की, त्या आपल्याला योग्य अयोग्य स्त्रीयांचा अवमान हे सगळं न्याय्य ठरवू लागलो आहोत? असा सवाल विचारला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
गायिका अंजली भारती यांनी भंडाऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृती फडणवीस यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून आता भाजप-शिंदेंसह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी याचा निषेध करत गायिकेवर कारवाईची मागणी केली आहे.
मुलाचं गुपीत माहिती असताना थाटामाटात केला विवाह; तपासणी करताच तरुणीला बसला धक्का
या व्हिडीओमध्ये ही गायिका थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृती फडणवीस यांच्या बलाकत्कार करण्यासाठी चिथावणी देत आहे. असं स्पष्ट दिसत असल्याच्या मु्द्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच शिंदेंच्या सेनेचे संजय निरूपम यांच्यासह ठाकरेंच्या सेनेचे अरविंद सावंत, संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
गायिका अंजली भारती नेमकी कोण?
अंजली भारती ही बौद्ध अनुयायी विद्रोही गायिका म्हणून ओळखली जाते. दीदी अंजली भारती या नावाने तिचं युट्युब चॅनेल आहे. त्यावर तिचे जवळपास पावणे सहा लाखांच्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर तिने आतापर्यंत दीड हजारहून अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यामध्ये तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक कामे गायल्याचे पाहायला मिळतं.
