दीपा-कार्तिकला जेनिलिया देशमुख जवळ आणणार?

  • Written By: Last Updated:
दीपा-कार्तिकला जेनिलिया देशमुख जवळ आणणार?

मुंबई : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये आता जेनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जेनिलियाचा आगामी वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनिलिया देशमुख ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये येणार आहे. जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय.

या मालिकेने नुकताच 900 भागांचा टप्पा पार केला. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्तिकच्या मनात असणारा हा गैरसमज दूर करण्यासाठी जेनिलिया देशमुखची मदत होणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन दोन्ही मुलींचा पिता होणं नाकारलं. दीपाला मुलीला वाढवताना बराच संघर्ष करावा लागला. मात्र कार्तिकला आता सत्य परिस्थितीचा उलगडा झालाय. त्यामुळे जाहीर माफी मागत तो सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार आहे. दीपा-कार्तिकच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा या आठवड्यात रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube