Shivai Bus: मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 ‘शिवाई बस’
मुंबई : मुंबई-पुणे (Mumbai – Pune) मार्गावर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक 100 ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus) धावणार आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बस (Shivneri Bus) हळूहळू थांबवण्यात येणार आहेत.
पुढील दोन महिन्यात शिवाई बसेसला गती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.
केंद्राच्या फेम 2 अंतर्गत पुढील दोन महिन्यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. ठाणे-पुणे(Thane – Pune) , दादर-पुणे (Dadar – Pune), नाशिक-पुणे (Nashik – Pune) , कोल्हापूर-स्वारगेट (Kolhapur- Swargrt) , औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवरही शिवाई बस धावणार आहे. ‘शिवाई’ बसचं मुंबई-पुणे प्रवासाचं भाडं 350 रुपये असण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकीटाचा खर्च साधारण 450-500 रुपये येतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही रक्कम मोठी असते. पेट्रोलचे भाव वाढल्याने अजून या तिकीटांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नव्याने रुजू झालेली शिवाई ही इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे याचे तिकीटदर कमी असणार आहे. साधारण 300-350 रुपये तिकीट भाडं असण्याची शक्यता आहे.