वरळीतील Music कॉन्सर्टमध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू; ड्रग्ज नव्हे धक्कादायक कारण समोर
या तरुणाचं नाव वृषभ गांगुर्डे असं तो माहीमचा रहिवासी होता. पोलिसांनी सांगितलं की, वृषभ गांगुर्डे या तरुणासोबत अजून एका तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाली होती.
मुंबईतील वरळी डोममधील लाईव्ह म्युझिक (Music) कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री लाईव्ह म्युझिकच्या कॉन्सर्टचं आयोजन आलं होतं ज्यात हजारो तरुण तरुणी आले होते. यावेळी 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी गोरेगावमधील नेस्कोमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी तरुणाने ड्रग्जचं अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याच तपासातून समोर आलंय. त्यामुळे वरळीमध्येही तसंच काही घडलं का असा संशय मुंबई पोलिसांना आला होता.
ड्रग्ज सेवनामुळे मृत्यू झाला आहे का याबाबतही तपास करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाने अति मद्यपान केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. तर त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही. मुंबई पोलिसांनी वरळीमधील तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण समोर आलंय. म्युझिक कॉन्सर्टदरम्यान तरुणाला कार्डियाक अरेस्ट अर्थात हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याच समोर आलंय. पोलिसांनी सांगितलं की, तरुणाने मद्यपानाचे अतिसेवन केलं होतं. त्यासोबत त्याने एनर्जी ड्रिंकही घेतलं होतं.
30 लाखांसाठी 3 लाखाची सुपारी देऊन सख्ख्या दाजीचा…, सांगलीत धक्कादायक अपघाताचा बनाव फुटला
प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितलंय. या तरुणाचं नाव वृषभ गांगुर्डे असं तो माहीमचा रहिवासी होता. पोलिसांनी सांगितलं की, वृषभ गांगुर्डे या तरुणासोबत अजून एका तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाली होती. त्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. म्युझिक कॉन्सर्टद आनंद लुटताना त्यांनी अतिमद्यपान केलं होतं. त्या गर्दीत त्या दोघांचा श्वास गुदमरल्यासारखं वाटलं. त्यानंतर वृषभचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं.
दरम्यान गोरेगावर नेस्को मैदानातील घटना ताजी असताना वरळी डोम मधील म्युझिक कॉन्सर्टला पोलिसांनी परवानगी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. पण आयोजकांनी थेट वरिष्ठ पातळीवरून हा कॉन्सर्टसाठी परवानगी मागितली. त्यामुळे आता या गर्दीवरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तरदुसरीकडे घटनास्थळी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.