जगात संगीत मैफिलीची अर्थव्यवस्था किती मोठी, PM मोदी काय म्हणतात? जाणून घ्या सविस्तर

जगात संगीत मैफिलीची अर्थव्यवस्था किती मोठी, PM मोदी काय म्हणतात? जाणून घ्या सविस्तर

Music Concert Economy Booming In India Significant Growth : गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय स्टार्सच्या संगीत मैफिलींचा ट्रेंड देशात वाढलाय. अलिकडेच, 25 अन् 26 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टने (Music Concert) मागील सर्व रेकॉर्ड मोडलेत. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात, परफॉर्मन्स लाईव्ह पाहण्यासाठी तब्बल अडीच लाख लोक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Economy) जमले होते. या कार्यक्रमाने टेक्सासमध्ये अमेरिकन गायक जॉर्ज स्ट्रेट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जमलेल्या 1.10 लाख लोकांच्या उपस्थितीचा विक्रम मोडलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अहमदाबादचे उदाहरण देऊन देशात संगीत कार्यक्रमांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आवाहन (Music Concert Economy) केलंय. ते म्हणाले की, आजकाल जगभरातील मोठे स्टार भारतात येऊ इच्छितात. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रासोबतच राज्य सरकारने देखील यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

कॉन्सर्टचा व्यवसाय किती मोठा आहे?

जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट मोठी भूमिका बजावतात. त्यापैकी सिंगापूर, अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे महत्त्वाचे आहेत. जागतिक स्तरावर, केवळ 2023 मध्ये, लाईव्ह कॉन्सर्टने जगभरात सुमारे 31 अब्ज कमाई केलीय. येत्या काळात त्यात मोठी वाढ होईल. उदाहरणार्थ, पॉप स्टार टेलर स्विफ्टच्या अलीकडील कॉन्सर्ट टूरमुळे उत्तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला 4.6 अब्ज डॉलर्स आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेत 1 अब्ज डॉलर्सने वाढ झाली.

बँक ऑफ बडोदाचा अहवाल समोर आलाय. त्यात नमूद केलंय की, कॉन्सर्टद्वारे हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, वाहतूक आणि किरकोळ व्यवसायालाही नवीन चालना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, या कार्यक्रमांना जाणारे लोक केवळ तिकिटे खरेदी करून फक्त करच भरत नाही, तर यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या जीएसटी संकलनातही मोठी वाढ झालीय. अहवालानुसार, या संगीत कार्यक्रमांद्वारे जगाला भारताचा सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची संधी मिळणार नाही, तर परदेशी पर्यटक देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासही हातभार लावतील.

मध्यमवर्गीयांना मिळणार दिलासा, कर प्रणालीमध्ये मोदी सरकार करणार मोठा बदल?

जागतिक स्तरावरील मैफिल पाहता, सध्या भारत या क्षेत्रात निश्चितच एक नवीन खेळाडू आहे अन् भविष्य उज्ज्वल दिसतंय. अहवालानुसार, गेल्या काही दिवसांत अनेक संगीत मैफिलींची घोषणा करण्यात आलीय. काही जागतिक स्टार पहिल्यांदाच येत आहेत. यामध्ये मरून 5, ग्रीन डे, शॉन मेंडिस, लुई टॉमलिन्सन अशी नावे आहेत. याशिवाय, कोल्डप्ले, दुआ लिपा, एड शीरन सारखे आंतरराष्ट्रीय स्टार पुन्हा भारतात सादरीकरण करत आहेत. दिलजीत दोसांझ, मोनाली ठाकूर आणि करण औजला यांसारख्या स्थानिक कलाकारांनी देशात हा ट्रेंड पुढे नेलाय.

तिकीट प्लॅटफॉर्मच्या अलीकडील अहवालात असं म्हटलंय की, लाईव्ह इव्हेंट्स किंवा कॉन्सर्टमधून मिळणारं उत्पन्न 9.5 पटीने वाढलंय. विशेषतः कोरोनाच्या साथीनंतर त्यात वाढ झालीय. आता लोकांना लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी घराबाहेर पडायचंय, त्यासाठी ते महागडे तिकिटे खरेदी करायला देखील तयार आहेत. लाईव्ह इव्हेंट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत, भारत दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढे 7 व्या क्रमांकावर आहे. मोठी लोकसंख्या, स्थिर चलन आणि पर्यटनासाठी अनुकूल वातावरण, यामुळं भारत हे संगीत कार्यक्रमांसाठी एक आवडतं केंद्र बनलंय. दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेला तेथे होणाऱ्या संगीत कार्यक्रमांमुळे मोठी चालना मिळालीय.

6 ते 8 हजार कोटींची अर्थव्यवस्था

यावर्षी एड शीरन, शॉन मेंडिस, ग्रीन डे आणि ब्लॅकपिंकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्टार भारतात परफॉर्म करणार आहेत. परिणामी देशाची संगीत कार्यक्रमांची अर्थव्यवस्था 6 ते 8 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. एका अहवालानुसार, 2028 पर्यंत संगीत बाजारपेठ 245 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याअंतर्गत 2024 मध्ये देशातील 300 हून अधिक शहरांमध्ये 30 हजारांहून अधिक लहान-मोठे शो आयोजित करण्यात आले. भारतात संगीत कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, देखील या क्षेत्राला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनीही केलाय.

भारतात अलिकडेच झालेल्या दिलजीत आणि कोल्डप्लेच्या संगीत कार्यक्रमांमध्येही वाद निर्माण झाले. दिल्लीत झालेल्या दिलजीतच्या संगीत कार्यक्रमात तिकिटांच्या काळ्या बाजाराचं प्रकरण समोर आलं होतं. तसंच उघडपणे दारू विकल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलीय. याशिवाय, ज्या जेएलएन स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तिथे चाहत्यांनी मालमत्तेचं बरंच नुकसान केलं होतं. चंदीगड येथील संगीत कार्यक्रमादरम्यानही असाच वाद निर्माण झाला होता.

गर्भवती महिलांसाठी गुडन्यूज! लसीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट…’ही’ खास सेवा सुरू

त्याचप्रमाणे, गायिका मोनाली ठाकूर डिसेंबरमध्ये वाराणसीत कॉन्सर्ट अर्ध्यावरच सोडून गेली होती. आयोजकांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप करत त्यांनी सांगितलं की, पैसे कमविण्यासाठी त्यांनी स्टेजसह इतर व्यवस्थेत निष्काळजीपणा दाखवला. पंजाबी गायक करण औजलाच्या संगीत कार्यक्रमातही असाच वाद निर्माण झाला होता. देशात होणाऱ्या या बड्या कॉन्सर्टसाछी केवळ पायाभूत सुविधाच नाही, तर वाहतूक कोंडी ही सुद्धा मोठी समस्या आहे. ज्या शहरात असे कार्यक्रम होतात, तिथे लोकांना लांब ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. याशिवाय, जास्त गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे अनेकांना सुरक्षित वाटत नाही.

कार्यक्रम स्थळांवरील शौचालयांची अवस्थाही वाईट होते, कारण इतक्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते. या सर्व समस्यांमागील कारण म्हणजे भारतात लाईव्ह कॉन्सर्टसाठी निश्चित ठिकाणांचा अभाव.देशात असे कार्यक्रम स्टेडियम किंवा खुल्या मैदानात आयोजित केले जातात. या जागा फक्त तात्पुरत्या आधारावर वापरल्या जातात. या कारणास्तव सिटिंग अरेंजमेंटपासून इतर सुविधांपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण होत नाहीत, परिणामी समस्यांचा सामना करावा लागतो.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube