जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.

जुन्या पुणे-मुंबई हायवेवर आज सकाळी एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला होता.  प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि अग्निशम दलाचे जवान, हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताची दखल घेत या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांचा मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफीशियल ट्विटरून याबाबतची माहिती दिली आहे. या टि्वटमध्ये लिहिलं आहे की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रतिक सहवेदना प्रकट करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उद्याचा हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube