दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती, अहमदनगरमधून एकाला अटक

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

Mumbai Police Threat Call : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अहमदनगरमधून (Ahmednagar) अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल केला होता. मुंबईत तीन दहशतवादी (terrorist) घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. यासिन सय्यद (वय 47) असं आरोपीचं नाव आहे.

महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अहमदनगर येथे कारवाई करत यासिन सय्यद याला ताब्यात घेतले आहे. दुबईहून शुक्रवारी सकाळी तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असे यासिने याने मुंबई पोलिसांना फोन करुन सांगितले होते. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचं नाव मुजीब सय्यद असल्याचं सांगितले होते. तसंच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर पोलिसांना दिला होता.

या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने तपाासाला सुरुवात केली होती. महाराष्ट्र एटीएसने देखील तपास केला होता. व्यक्तिगत वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झालं. आरोपीने 2013 साली हे सिमकार्ड विकत घेतले होते आणि ते कार्ड बंद नये म्हणून ते फक्त रिचार्ज करत होता. बदला घेण्यासाठी मुंबई पोलिसांना फोन करताना त्याने या सिम कार्डचा वापर केला होता.

असदचा एन्काउंटर होताच नाचायला लागली कंगणा रणौत; म्हणाली, “योगी दादांसारखा…”

यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला अहमदनगरमधून अटक करुन त्याला मुंबईत आणलं आहे. पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सतत असे फेक कॉल केले जात आहेत. पुढे तपासात फोन करणारे व्यक्ती मनोरुग्ण किंवा एखाद्या व्यक्तीशी बदला घेण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube