Aaditya Thackeray यांचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, ‘माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावं…

Aaditya Thackeray यांचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, ‘माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावं…

मुंबई : शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. नागपूरमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. नागपुरात सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर औरंगाबादमध्ये देखील महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मात्र कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने मविआला धक्का दिला. या घटना बाह्यय मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) तुम्ही वरळीतून निवडणूक लढून दाखवा, असा चॅलेंज आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) यावेळी दिला.

विधान परिषद निवडणूक निकालावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. निवडणूक असते हार जीत सुरूच राहाते. पण हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घेऊन दाखवा, असं थेट चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला.

दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. आपल्या देशात आणि मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही असा विचार आता मनात येतो. राज्यात देखील हेच सुरू आहे. आपली मुंबई शहराला जगभरात ओळखली जात. मुंबईकर म्हणून आपली ओळख आहे. मात्र त्याच मुंबईमध्ये गेल्या एक वर्षापासून कोणाचीही सत्ता नाहीये, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक अंदाधूंद कारभार करत आहेत, जनतेच्या पैशांचा चुरडा होत असल्याचं म्हणत, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube