मविआतील पक्षांना तडजोड करावी लागणार, बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं…

मविआतील पक्षांना तडजोड करावी लागणार, बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं…

राज्यातील राजकीय परिस्थिती बदललीय, त्यामुळे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना तडजोड करावीच लागणार असल्याचं विधान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले

अशोक चव्हाण म्हणाले, अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. सध्या राज्याची परिस्थिती बदलल्याने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना तडजोड करावीच लागणार असल्याचं म्हटलं आहे.

सिद्धरामय्यांनी निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळला! अतिरिक्त तांदळाऐवजी आता पैसे मिळणार

तसेच महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांनी मिळून निवडणुक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका असून इतर पक्षही अनूकुल आहेत. आजच्या बैठकीत अधिवेशनाच्या अनुषंगाने पुन्हा बैठक घेण्याबाबत चर्चा झालीय. अधिवेशनाआधी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक पार पडणार असून बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा ठरवण्यात येणार आहे.

पुण्यातील ‘त्या’ तरूणीला जीवदान देणारा, देवदूत लेशपाल जवळगे कोण आहे?

यावेळी बोलताना चव्हाण यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटंपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुणे आणि हिंगोली लोकसभेच्या पोटनिवडणूक जेव्हा लागेल तेव्हा यावर चर्चा करुन पण निवडणूक लागले की नाही याबाबत शाश्वता नसल्याचं ते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे नेते ज्या ठिकाणी निवडून आले होते. जे खासदार पक्षात आहे तिथे प्रश्न येणार नाही. जिथे नेते निघून गेले तिथे चर्चा होईल. तिथली बदललेली राजकीय परिस्थिती पाहून चर्चा होणार असून विद्यमान परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून मेरिट समोर ठेवून निर्णय घ्यावा लागणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेही उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांशिवाय जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube