पुण्यातील ‘त्या’ तरूणीला जीवदान देणारा, देवदूत लेशपाल जवळगे कोण आहे?

पुण्यातील ‘त्या’ तरूणीला जीवदान देणारा, देवदूत लेशपाल जवळगे कोण आहे?

Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना, मंगळवारी पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. मात्र सुदैवाने ती वाचली. (Who is Leshpal Javlage who save MPSC Student in Pune Sadashiv peth )

वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या

भर रस्त्यावरच हा भयावय प्रकार सुरू असताना या तरूणीच्या मदतीला सुरूवातीला कोणीही आलं नाही. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाला रोखल आणि सुदैवाने तिचे प्राण बचावले. या तरूणीला बचावणाऱ्या तरूणाने या हल्लेखोराला चांगला चोपही दिला. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या हल्ल्यात ही तरूणी जखमी झाली होती. तिच्यावर नजीकच्या रूग्णालयात उपाचार करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती होता-होता राहिली आहे. मात्र या तरूणीला जीवदान देणारा, देवदूत लेशपाल जवळगे कोण आहे? पाहुयात…

पुण्यातील ‘त्या’ तरूणीला जीवदान देणारा, देवदूत लेशपाल जवळगे कोण आहे?

का झाला तरूणीला हल्ला?

शंतनू जाधव या तरूणाने एकतर्फी प्रेमातून या तरूणीवर हा हल्ला केला. तिने आपल्याशी बोलणं बंद केलं. त्याची तक्रार घरच्यांकडे केली. या रागातून त्याने हा हल्ला केला. सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागातून ही तरूणी तिच्या दुसऱ्या मित्रासोबत जात होती. यावेळी शंतनूने त्यांना थांबवले. मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरूणी या ठिकाणाहून पळाली. तेव्हा त्याने तिचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती वाचली.

कसे वाचवले तरूणीचे प्राण?

शंतनू जाधव हा या तरूणीच्या मागे कोयता घेऊन धावत असताना तेथे लेशपाल जवळगे हा तरूण आला. त्याने तरूणीवर वार होण्याआधीच शंतनूच्या हातातील कोयता वरच्या वर झेलला. त्याला वार करण्यापासून रोखले. या तरूणाने धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाल रोखल्याने सुदैवाने तिचे प्राण बचावले. यावेळी लेशपालच्या मदतीला हर्षद पाटील हा तरूण देखील धावून आला होता. त्या दोघांनी या हल्लेखोराला थेट पोलीस स्टेशनला दाखल केले.

कोण आहे लेशपाल जवळगे?

लेशपाल जवळगे हा तरूण देखील एमपीएससी परीक्षेची तयारी करतो. गेल्या काही महिन्यापासून तो पुण्यात अभ्यासाठी राहत आहे. त्याचबरोबर त्याला क्रीडा क्षेत्रातही आवड आहे. तो विशेषतः कबड्डीची अधिक आवड आहे. या घटनेनंतर त्याने सामाजातील या विकृतीवर संताप व्यक्त केला. तसेच या तरूणाच्या या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

या तरूणांचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी कौतुक केलं तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही तरूणांच्या धाडसाला सलाम करत प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल…!! असं देखील त्यांच्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube