अमृता फडणवीसांकडे दहा कोटींची खंडणी मागितली कशी?

  • Written By: Published:
अमृता फडणवीसांकडे दहा कोटींची खंडणी मागितली कशी?

मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे व खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे. फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) व तिचे वडिल अनिल जयसिंघानी हे अटकेत आहेत. अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचून त्यांच्याकडे दहा कोटींची खंडणी कशा पद्धतीने मागण्यात येत होती, याबाबत काही बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत.

अमृता फडणवीस या पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. पुण्यातून मुंबईला जात असताना त्यांचा पाठलाग आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिने केला होता. त्यानंतर अनिक्षा हिने अमृता यांना फोन करून तिच्या वडिलांना पोलिसांनी एका गुन्ह्यात आरोपी केले आहे. त्यांना वाचविण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देण्यास तयारी अनिक्षा हिने दाखविली होती. त्यानंतर अमृता यांनी अनिक्षा हिचा फोन कट करून तिचा मोबाइल नंबर ब्लॉक करून टाकला होता.


धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग

त्यानंतर दोनच दिवसात १८ फेब्रुवारीला अमृता यांना एक अनोळखी मोबाइलवरून सुमारे २२ व्हिडिओ क्लिप, तीन व्हाइस नोटस अनेक मेसेज व्हाटसअॅपद्वारे पाठविण्यात आल्या. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्याकडे कर्मचारी असलेल्या गुरशरण कौर यांच्याकडे या क्लिप पाठविला होत्या. या क्लिपच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांच्यावर अनिक्षा आणि तिचे वडिल हे दबाव टाकत होते. त्यास अमृता या तयार नसल्याने आधीच रेकॉर्ड करून ठेवलेले व्हिडिओ, ऑडिओ व मेसेजस पाठवून आमचे काम करा नाही तर वाईट परिणाम होतील, अशी धमकीच दिली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे तक्रारही नोंदविली आहे.

या प्रकरणाचा पोलिस तपास करत होते. त्या चौकशीत अनिक्षा व तिचे वडिल हे अमृता यांना फसवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अनिक्षा जयसिंघानी हिने अन्य अनोळखी मोबाइलवरून व्हॉटसअपद्वारे अमृताशी संपर्क साधला. पाठविलेले सर्वज मेसेज, व्हिडिओ डिलिट करण्यासाठी अमृता यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली होती. त्यानुसार आता जुन्या गुन्ह्यात याचे कलम वाढविण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube