तु्म्ही माझ्याकडं उद्या चहाला या… अंजली दमानिया यांचं त्या नेत्यांना थेट आव्हान
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी आरोप केला आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे (Damania) राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR)च्या आधारे हा खुलासा केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी आरोप केला आहे. त्यानंतर या तिघांची नाव गेत दमानिया यांनी यांना आव्हान दिलं आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांनी दमानिया यांनी CDR ची माहिती सार्वजनिक कशी केली, याची चौकशी व्हावी आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. या सर्व आरोपांवर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की, त्यांना हा CDR एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाला. तसेच, माझ्यावर टीका करण्याऐवजी अशोक खरात यांच्यावर का बोललं जात नाही, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.
दमानिया यांचं ट्वीट काय?
मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी आज रात्री मुंबईत परत येत आहे. माझी या खालील लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी चहाला या….
मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा, मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले ते पहा, इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल ते तुमच्या समोर शोधून, त्यात Incoming, outgoing, call summary कशी येते, ते तुम्ही पहा
१) सुषमा अंधारे
२) संजय राऊत
३) शशिकांत शिंदे
यांना आदरपूर्वक आमंत्रण…मात्र ह्या नंतर, खरात या विषयावर चर्चा करा. आणि हो, मी ही माहिती द्यायला DG सर यांची वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांना देणार आहे. असं दमानिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्त्वाची घोषणा!
मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले.
मी आज रात्री मुंबईत परत येत आहे.
माझी या खालील लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी चहाला या….
मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा, मी Claude हे AI वापरून…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 5, 2026