बसमध्ये मोबाईलचा वापर करताय सावधान! अन्यथा…

  • Written By: Published:
बसमध्ये मोबाईलचा वापर करताय सावधान! अन्यथा…

मुंबईतल्या बेस्ट बस मधून तुम्ही प्रवास करत असताना मोबाईलवर गाणे,व्हीडिओ मोठ्या आवाजात ऐकत असाल किंवा मोठ्याने बोलत असला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाही होणार आहे त्यामुळे प्रवाश्यांनी सावध होणे गरजेचे.

या संदर्भात बेस्टच्या वाहतूक विभागाकडून असे पत्रक काढण्यात आले असून मुंबईतल्या सर्व बेस्ट आगरांना सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण रस्त्याने जाताना किंवा प्रवास करताना मोबाईल वर मोठ्या आवाजात बोलतात याचा त्रास सर्वांनाच होत असतो.

बेस्ट बस मधून प्रवास करणारे मोठ्या आवाजात बोलतात, गाणी वाजवतात किंवा व्हिडिओ बघतात याचा आवाज मोठा असतो याचा त्रास सहप्रवाश्यांना होतो. या संदर्भात प्रवाश्यांनी बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. बेस्ट प्रशासनाने आज अश्या प्रकारचे पत्रक काढले आहे.

नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कॉंग्रेसला पडायचंच नाही

मुंबईतल्या सर्वच आगारात सूचना देऊन इअर फोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ व्हिडिओ गाणी वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. अश्या प्रकारचे आढळून आल्यास त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 38 /112 नुसार कारवाही करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube