स्वतःच्या पक्षाची ‘लायकी’ बघावी..; गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

स्वतःच्या पक्षाची ‘लायकी’ बघावी..; गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाजपवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली. भाजपाला लोकसभेला किती जागा मिळणार, याची चिंता शरद पवारांनी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, अशी गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका केली.

शरद पवार यांचे ३ खासदार राहिले तर बरं.. स्वतःच्या पक्षाची लायकी काय आहे ते बघावी,.. आम्ही ४०० ची गोष्ट करतोय तर ते अजून ४ वरच आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. तुम्ही भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे जात आहे ? पार्टी विसर्जित करण्याची वेळ तुमच्यावर आलीय, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. राजकारणात रहायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करणे सोडा, असा इशारा त्यांनी दिलाय. यावर गोपीचंद पडळकरांनी खोचक टीका केली. अशा पवारांना कोलत कोलतच मी राजकारणात आलो आहे. यामुळे त्यांनी मला सांगण्यापेक्षा शरद पवार आणि रोहित पवार यांनी दोघांनी एकत्रित बसलं पाहिजे. त्यांनी मागील ५० वर्षात कुणा-कुणाची वाट लावली हे आजोबांकडून समजून घेतलं पाहिजे, असं पडळकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube