भाजप आमदार मंदा म्हात्रेंना ह्रदयविकाराचा झटका; नवी मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू
BJP MLA Manda Mhatre यांना सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास हृदयविकाराच्या सौम्य झटका आला. त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
BJP MLA Manda Mhatre suffers heart attack; treatment underway at a hospital in Navi Mumbai : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास हृदयविकाराच्या सौम्य झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पुण्यात फक्त घरपोचच गॅस सिलिंडर मिळणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
समोर आलेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री म्हात्रे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांनी त्वरित उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे पुत्र निलेश म्हात्रे यांनी दिली. या शस्त्रक्रियेमध्ये म्हात्रे यांच्या शरीरात दोन स्टेंट बसवण्यात आले आहेत.
पुरूषार्थच श्रेष्ठ अन् पत्नी आज्ञाधारीच हवी; अहवालात जेन झीचे धक्कादायक विचार समोर
तर अचानक घडलेल्या घटनेमुळे बेलापूर आणि नवी मुंबईतील राजकीय व सामाजिक वर्गात चिंचेचा वातावरण पसरलेलं आहे. कारण मंदा म्हात्रे यांना नवी मुंबईतील प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विधानसभेमध्ये त्या बेलापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर एक आक्रमक चेहरा आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
