Google Office बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

  • Written By: Published:
Untitled Design (36)

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन करून पुणे गुगल कार्यालयात (Pune Google Office) बॉम्ब ठेवण्याची धमकी (Threat) दिली. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. फोन करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगितले.

 

इमारतीला अलर्ट करण्याचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, त्यांना महाराष्ट्रातील पुणे शहरातील गुगल कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. यानंतर परिसरात काही काळ अलर्ट ठेवण्यात आला होता. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख म्हणाले, पुण्याच्या मुंढवा परिसरातील इमारतीच्या 11व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयाला रविवारी रात्री उशिरा फोन आला की, कार्यालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आली असल्याची धमकी देण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले की, पुणे पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, परंतु बराच शोध घेतल्यानंतरही त्यांना काहीही सापडले नाही आणि हा धमकीचा कॉल फसवा असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव पनयम शिवानंद असे असे सांगितले होते, तो हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला हैदराबाद येथून अटक केली. मात्र, त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मद्यधुंद अवस्थेत कॉल केल्याचे आढळून आले. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Tags

follow us