‘जनतेला हसवणाऱ्या भारत गणेशपुरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर
मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर भारत गणेशपुरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारत गणेशपुरे यांना मातृशोक झाला. त्यांची आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचं गुरूवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. भारत गणेशपुरे यांच्या भावाच्या घरी मनीष गणेशपुरे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रीने अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्यानं गणेशपुरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मनीष यांच्या राहत्या घरातून म्हणजेच रहाटगाव गुरूवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास स्मशानभूमीकरता अत्यंयात्रा निघणार आहे. भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष गणेशपुरे यांच्या रहाटगाव येथे असलेल्या अमरावती येथील राहत्या घरी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भारत गणेशपुरे हे मुंबईहून अमरावतीला रवाना झाले आहेत. दिशा ग्रुपचे सचिव स्वप्निल गावंडे आणि दिग्दर्शक विराग वानखेडे यांच्या सहकार्यानं भारत यांच्या आईचे नेत्रदान करण्यात आले.
कलाकारांच्या आयुष्यात असे काही क्षण हे येतच असतात. परंतु या कलाकाराला त्यानूसार स्विच ऑन आणि स्विच ऑफ व्हावे लागणार आहे. अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिने देखील एका कार्यक्रमामध्ये भारत गणेशपुरे यांना जेव्हा त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली होती, तेव्हा कशाप्रकारे दुसऱ्या क्षणी ते कलाकाराच्या भूमिकेत शिरले याची आठवण करून देत भारत गणेशपुरे यांच्या जिद्दीचे कौतुक केले होते.