CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अनाथ आश्रमात धुळवड

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अनाथ आश्रमात धुळवड

ठाणे : ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेम्भी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांना विनम्रपणे अभिवादन करून त्यांच्या तसबीरीवर आदरपूर्वक रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला.

त्यानंतर आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना (Shiv Sainik) शुभेच्छा देऊन त्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्या उत्साहात आणि आनंदात धुळवडीचा सण साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत रंगांची उधळण करत हा सण दरवर्षीप्रमाणे हा सण साजरा करण्यात आला.

…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक राजेश मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शहरप्रमुख हेमंत पवार, टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच त्यांनी धुलीवंदनाच्या निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत रंगपंचमीचा सण साजरा केला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करत असल्याचे पाहुन पोलिसांनी देखील आपणेपणाने रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटूंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्तेही रंग खेळले तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, सर्व पोलीस बांधव तसेच बंगल्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube