Gautam अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करा, मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

Gautam अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करा, मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

मुंबई : उद्योजक गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या प्रमुख मागणी उद्या मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थिती राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा आणि अदानीच्या गैरकारभाराची चौकशी होण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

तसेच संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत, परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या आंदोनामध्ये राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube