मुंबई–कोकण प्रवाशांना दिलासा; सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित रेल्वेसेवेचा शुभारंभ

CSMT–Sawantwadi Road Train; CSMT–सावंतवाडी रोड नियमित रेल्वेसेवा सुरू; मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर होणार.

CSMT–Sawantwadi Road Train

CSMT–Sawantwadi Road Train: मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन नियमित रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार असून कोकणवासीयांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.

10 लाखांची ओपनिंग अन् कमाई 192 कोटी पार! हनुमान अंश ठरला 2026 चा सरप्राइज ब्लॉकबस्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियमित रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. आज (11 सप्टेंबर) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला सहभाग घेतला.

छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा घणाघाती वार

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून नवीन रेल्वेसेवेला सुरुवात करण्यात आली. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

follow us