Union Budget 2023 : निर्मल आशा देखील धुळीस मिळाली, आव्हाडांनी सांगितले कारण..

Union Budget 2023 : निर्मल आशा देखील धुळीस मिळाली, आव्हाडांनी सांगितले कारण..

मुंबई : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी अर्थसंकल्पावर दिली.

गेले अनेक वर्षे बजेट बघतोय. बजेट म्हणचे फुगवलेले आकडे असतात. बाकी त्यात सत्यता काही नसते. ज्या पध्दतीने जीडीपी मॅनेज करतात. ती पध्दत बघितल्यावर सगळे अर्थसंकल्प फुगवलेले फुगे आहेत. याव्यतिरिक्त या फुग्यांमध्ये काही नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवार (दि.31) पासून सुरुवात झाली. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube