Naresh Goyal: जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; 538 कोटींची संपत्ती जप्त

Naresh Goyal: जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; 538 कोटींची संपत्ती जप्त

Jet Airways Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Jet Airways Naresh Goyal ) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. ईडीने (ED) बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Money Laundering) नरेश गोयल यांच्यासह 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता ईडीने नरेश गोयल (Naresh Goyal) यांची 538 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.


ईडीने 31 ऑक्टोबर दिवशी नरेश गोयल आणि त्यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (PMLA Case) कॅनरा बँक घोटाळ्या प्रकरणी नरेश गोयल यांची ईडीने 538 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीने नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर दिवशी अटक करण्यात आली आहे. नरेश गोयल हे सध्या मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत.

ईडीने कारवाई करत असताना स्पष्ट सांगितलं आहे की, नरेश गोयल यांच्याविरोधात पीएमएलए 2000 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या कारवाईमध्ये नरेश गोयल यांची 538 कोटी रुपयांची तात्पुरती स्वरुपाची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अनेक कंपनी आणि व्यक्तींच्या नावावर 17 बंगले आणि व्यावयायिक गाळे असल्याचे समोर आले आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं?

नेमकं काय आहे प्रकरण?

कॅनरा बँकेने आरोपात सांगितले आहे की, ‘ जेट एअरवेज लिमिटेडला 848.86 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होतं. त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित आहेत. या कारणावरून कॅनरा बँकेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बंद पडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ईडीने नरेश गोयल आणि इतर लोकांच्या विरोधामध्ये ईडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर ईडीने नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज लिमिटेड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube