काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला; बॅनर्स झळकले

  • Written By: Published:
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला; बॅनर्स झळकले

ठाणे :  निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये (Congress) काँग्रेस– राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला, असा मजकूर असलेला बॅनर्स झळकला आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालांतर ठाकरे गटात नाराजी पसरली, तर शिंदे गटात मोठा आनंद साजरा केला गेला. . धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गटानने फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्या बॅनर्समध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला, असं बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघे यांना उद्देशून म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

अंबरनाथच्या वडवली परिसरातील रोटरी क्लब चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत. युवा सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य स्नेहल कांबळे यांनी हे बॅनर्स लावले असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Chinchwad Bypoll : लक्ष्मण जगताप यांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्यासाठीच निवडणुकीत उतरलो!</a
>

न्यायालयाने चिन्ह आणि पक्ष या दोन्ही गोष्टींचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. तेव्हापासून दोन्ही गटातील नेत्यांकडून टोकाची टीका केली जात आहे. दरम्यान, या बॅनर्समुळे शिवसेना आणि ठाकरे गट यांच्या वादात आणखी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube