खराब हवामानाचा फटका, Eknath Shinde – Fadnavis यांचे विमान माघारी

  • Written By: Published:
_LetsUpp (9)

मुंबई : मुंबईमधील खराब हवामानाचा फटका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रवास करत असलेल्या विमानाला बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, खराब हवामानामुळे विमान माघारी परतले. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांचा जामनेर दौरा रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा आज समारोप आहे. गेल्या पाच दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.. या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित झाले आहेत. आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील याच कार्यक्रमासाठी जळगावला जाणार होते. पण ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे त्यानं परत याव लागलं. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us