“अरविंद सावंत मला माल म्हणाले”; ऑडिओ ऐकवत शायना एनसींचा खळबळजनक आरोप
विशेष प्रतिनिधी (प्रशांत गोडसे)
Mumbai News : मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अरविंद सावंत यांनी मला माल म्हणून संबोधित केलं असा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. शायना एनसी यांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला. सुरुवातीला त्यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा ऑडिओ ऐकवला. नंतर त्या म्हणाल्या, उबाठा पक्षाच्या नेत्यांची मनस्थिती यावरून समजते. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या वक्तव्यावरून का काही बोलत नाहीत. याचा अर्थ ते देखील अशा वक्तव्याला समर्थन देतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा वक्तव्यानंतर जनताच त्यांना या निवडणुकीत बेहाल करेल असा इशारा शायना एनसी यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात जोरदार सुरुवात झाली. मुंबईत प्रचाराचा जोर अधिकच पाहायला मिळत आहे. मुंबईतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील नेत्यांच्या एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. बाहेरचा माल मुंबादेवीत चालणार नाही. या ठिकाणचा माल चालेल तो म्हणजे अमीन पटेल, असे वक्तव्य करत शायना एनसी यांचं नाव न घेता खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर आज शायना एनसी यांनी जोरदार पलटवार केला.
भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; त्या मतदारसंघांत खास प्लॅन!
नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांच्या प्रचारा दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत ‘माल’ म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्हाला इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे असे वक्तव्य त्यांनी केले. माल म्हणताना त्यांनी कुणाचा उल्लेख केला नाही. मात्र या मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेवार शायना एनसी यांनी मला माल म्हणून संबोधल्याचा दावा केला.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार शायना एनसी यांनी शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवत गंभीर आरोप केला आहे. अरविंद सावंत यांनी प्रचारादरम्यान इम्पोर्टेड माल म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. सदर व्हिडीओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी ठाकरे शिवसेना आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला.
भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?
उबाठा पक्षाच्या नेत्यांची मनस्थिती यावरून समजते. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या वक्तव्यावरून का काही बोलत नाहीत याचा अर्थ ते देखील अशा वक्तव्याला समर्थन देतात. अशा वक्तव्यानंतर जनताच त्यांना या निवडणुकीत बेहाल करेल असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला.
अरविंद सावंतांवर कारवाई करा : प्रसाद लाड
मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे कारण एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलेली आहे. परंतु त्याच्या विपरीत काम अरविंद सावंत यांनी केले आहे असे भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.