जेलमध्ये कैद्यांच्या शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो, निलेश राणेंचा हल्ला

जेलमध्ये कैद्यांच्या शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो, निलेश राणेंचा हल्ला

मुंबई : ‘मी जर तोंड उघडेल तर केंद्राला हादरा बसेल – संजय राऊत अर्थर रोड जेलमध्ये याने शौचालयात दुसऱ्या कैद्यांकडून शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो.’ अशी टीका माजी आमदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राणेंनी ही टीका ट्विट करत केली आहे.

शिवसेनेचे खासदार आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मी तोंड उघडलं तर केंद्राला हादरा बसेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. वेगवेगळ्या मार्गाने धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मी यांचा बाप आहे, असं स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला होता.

त्यावर आमदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्याचा थेट समाचार घेतला आहे. ‘संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये याने शौचालयात दुसऱ्या कैद्यांकडून शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो.’ अशी एकेरी शब्दांत टीका करत राणेंनी संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये त्यावेळी झालेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी ही टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube