‘त्या बागेच्या पुऱ्या खानदानाची….’; बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमावरून आव्हाड भडकले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (18)

Jitendra Avhad Agrressiv On Bageshwar Maharaj Program :  तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं किर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे ते १०० टक्के महाराष्ट्र द्रोही आहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. त्या बागेच्या पुऱ्या खानदानाची अक्कल तुकारामाच्या पायाच्या नखा एवढी पण नाहीये कुठे तुकाराम महाराज आणि कुठे हा बागेश्वर असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवरती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बद्दल जे वक्तव्य त्या बागेश्वर महराजांनी केलं ते मन दुखवणार आहे. महाराष्ट्राच्या मातीचा महाराष्ट्राचा संस्कृतीचा अपमान आहे आणि म्हणून तुम्ही त्याला बाबा म्हणतात मी त्यांना बाबा म्हणत नाही.

https://letsupp.com/maharashtra/if-it-was-my-younger-brother-i-would-not-have-gone-to-jail-chhagan-bhujbal-became-emotional-at-the-memory-of-gopinath-munde-25349.html

मतं पडणार नाहीत असं वाटत असतं तेव्हा काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठं करायची.मतं मिळत नाहीत हे दिसू लागलं की असं काहीतरी थोतांड करायचं असे म्हणत त्यांना नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. तुकाराम महाराजांविषयी बोलणाऱ्या बागेश्वरला सन्मान मिळणार असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण ज्याने तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याने महाराष्ट्राचा अपमान केला. अशा माणसाचा कार्यक्रम घेणारे लोक महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्र द्वेषी आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Thackeray Vs Shinde : तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवू शकतात; काय आहे त्यामागचं कारण…

दरम्यान, बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम राज्यात होऊ नये तसेच त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे केली होती. या कार्यक्रमाला परवानगी देणे म्हणजे  अंधश्रद्धेला चालना देणे असे आहे. आपले राज्य हे पुरोगामी असून, अंद्धश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना येथे जागा नसल्याचे पटोले म्हणाले होते.

 

Tags

follow us