ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच टक्के मागतायत : आव्हाड लवकरच नाव जाहीर करणार

Untitled Design   2023 05 15T160656.706

Jitendra Awhad Speak on Thane Municipal Corporation Corruption : ठाणे महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करत हे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच मागतायत, असा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे. तसेच मी लवकरच संबंधितांची नावे जाहीर करणार असल्याचा इशारा देखील यावेळी आव्हाड यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड?
ठाणे, कळवा, मुंब्रा येथे ठाणे महानगरपालिकेची रस्त्याची कामे चालू आहेत. त्यासाठी खास निधी आणला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. सगळ्या भागातील रस्ते चांगले आहेत फक्त त्याच्यावर नवीन डांबर टाकायचं आणि करोडो रुपयाची बिले काढायची. आणि ह्याच्यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत. किती फसवणार आहेत ठाणेकरांना? असा प्रश्न आमदार आव्हाड यांनी केला.

मी स्वतः हे लिहीत आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला मी तुम्हांला दाखवतो कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका झाले आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे स्टँडिंग कमिटीला जास्तीत जास्त एक टक्का ते दिड टक्का घ्यायचे आता महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेट वाढवलेला आहे. आणि तोही किती तर 5 टक्के. आणि जोपर्यंत 5 टक्के (मी नावही जाहीर करेन) ज्या अधिकाऱ्याच्या हातात देत नाहीत तोपर्यंत फाईलवर सहीच होतं नाही. बाहेर आल्यावर स्वतःला अतिशय पापभिरू अधिकारी म्हणून मिरवणारे केबिन मध्ये बसल्यावर रावणाचा अवतार धारण करतात आणि भस्मासूरासारखे वागतात.

5 टक्के… आयुक्त साहेब तुम्ही तर विचार करा गरीब ठेकेदाराला 5 टक्के एकत्र द्यायला जमतात का? सगळीकडे काम बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. एक टक्क्यावरच समाधान मानायला हव होतं. आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी 5 टक्के मागायला लागले आहेत. आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल.

Tags

follow us