Kasba-Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार दिल्लीतून होणार जाहीर : चंद्रकांत पाटील

Kasba-Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार दिल्लीतून होणार जाहीर : चंद्रकांत पाटील

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी आमचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने या पोटनिवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याने आम्ही गाफिल राहणार नाही. कसबा हा आमचा पारंपारिक मतदार संघ जरी असला तरी आम्ही याठिकाणी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत अलर्ट राहुल आमचे मतदान कसे वाढेल यासाठी प्रयतशील आहोत. सध्या आमची तीन नावावर चर्चा झाली आहे. ही नावे प्रदेश समितीकडे पाठवणार असून अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार हे तुम्हाला लवकरच दिल्लीतून कळेल, अशी माहिती पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणूक संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज (सोमवारी) पहिली बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, हेमंत रासने, शैलेश टिळक उपस्थित होते.

येत्या 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. सर्वच पक्ष पोटनिवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की आम्ही तीन नावे फायनल केली आहेत. मात्र, ती आताच जाहीर करणार नाही. यासंदर्भात आज पहिली बैठक झाली. यापुढे आमच्या पक्षाच्या कार्यालयात बैठक होणार आहेत. त्यानंतर आम्ही प्रदेश समितीकडे नावं जातील. त्यानंतर अंतिम उमेदवार हा दिल्लीतून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला पुढील काही दिवस वाट पाहावी लागेल.

कसबा मतदार संघात आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि कुणाल टिळक हे उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. शैलेश टिळक हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल याकडे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube