Ajit Pawar : 288 आमदारांमध्ये फक्त 40 आमदारांचे सरकार, भाजपमध्ये धूसफूस

Ajit Pawar : 288 आमदारांमध्ये फक्त 40 आमदारांचे सरकार, भाजपमध्ये धूसफूस

मुंबई : चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण चालली आहे. 288 आमदारांमध्ये 40 आमदारांचे सरकार आहे का? अशी शंका येते. भाजपचे (BJP) 105 आमदार नाराज झालेत. ते बोलत नाहीत पण त्यांच्यात धूसफूस चाललीय. त्यांना फार त्रास होतोय. तुम्ही त्यांना सांगता.. अरे थांबा.. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा काहीतरी बरं चाललंय. तुम्ही त्यांना काहीच बोलू देत नाहीत. सत्ता टिकवणं हेच सरकारचे ध्येय आहे. त्यामध्ये चाळीस आमदारांना जास्त सांभाळावे लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत (Budget Session) केली.

अनेक पालकमंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी दिल्याने मिटिंग वेळेवर होत नाहीत. आढावा घेतला जात नाही. कृषीमंत्री काय करतात काही कळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल टिंगल टावळी करणारे वक्तव्य करतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समज देखील देत नाहीत. नव्याचे नऊ दिवस पण आता नऊ महिने झाले अजून किती दिवस थांबायचे? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

Kane Williamson : भारताला पराभूत करणाऱ्या कर्णधारानेच दिलं WTCच्या अंतिम सामन्यात स्थान

शिंदे-फडणवीस सरकारचे शासकीय कामांकडे लक्ष नाही. दुसऱ्या गटातील आमदारांवर वर्चस्व निर्माण करणे, विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, विरोधी आमदारांच्या कामांना स्थिगिती देणे,निधी रोखणे, सत्कार, समारंभ, देवदर्शन अशाप्रकारच्या राजकारणात हे सरकार रमले आहे. जनतेला मात्र वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

महाविकास आघडीच्या काळातील विकास कामांना स्थगित्या दिल्या आहेत. विरोधी पक्षातील आमदारांचे निधी आडवले गेले आहेत. विरोधी पक्षांतील आमदारांच्या मतदार संघात जनता राहत नाही का? ते मतदारसंघ महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का? हे फक्त विरोधी पक्षातील आमदारांना अडचणीत आणले नाहीतर जनतेचा देखील विश्वासघात केला आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube