हायकोर्टाने दिला LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल; काही तासांतच पुन्हा आपल्या सेवेत

हायकोर्टाने दिला LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल; काही तासांतच पुन्हा आपल्या सेवेत

Lokshahi Marathi News : LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. (Lokshahi Marathi News ) 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता थेट दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) LOKशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी लोकशाही मराठी चॅनलचं लायसन्स 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. या आदेशामध्ये मंत्रालयाने लोकशाही चॅनेलला थेट प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिले ाहेत. आज सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रक्षेपण करण्याचं माहिती प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, १४ जुलै रोजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्‍लिल व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ते सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.

14 जुलै 2023 रोजी लोकशाही चॅनेलवर एक बातमी दाखवली होती. त्यानंतरच आम्हाला 72 तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. त्यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं लोकशाही मराठीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘लोकशाही’ मराठी वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्र सरकारने घातलेल्या 72 तासांच्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली होती. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी माहिती आणि प्रसारण विभागाने शुक्रवारी कारवाई करत ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर 72 तासांसाठी बंदी घातली होती.

मोठी बातमी! लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश…

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाला ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीत वृत्तवाहिनीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की किरीट सोमय्या यांची कथित व्हिडिओ क्लिप अश्लील नसून हा सरकारचा निर्णय आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला आणि पुढील आदेशापर्यंत शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून प्रसारण सुरू करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, माध्यमांतून स्पष्टपणे, निर्भिडपणे पत्रकारीता करण्याचे काम आम्ही केलं असून 26 जानेवारी रोजी आम्ही चौथा वर्धापन दिन साजरा करणार होतो. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून नोटीस देण्यात येत होत्या. 14 जुलै 2023 रोजी एक बातमी दाखवली होती. आम्हाला 72 तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही न्यायलयीन लढाई लढणार असल्याचं लोकशाहीकडून सांगण्यात आलं आहे.

वृत्तवाहिनी 30 दिवसांसाठी बंद राहील, परंतु त्याचे डिजिटल ऑपरेशन्स अव्याहतपणे सुरू आहेत. लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले की ते त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बातम्या देत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube