Mahadev Betting App प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुंबई पोलिसांच्या हाती

Mahadev Betting App प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुंबई पोलिसांच्या हाती

Mahadev Book App : बॉलीवूड क्षेत्रात सध्या मोठा धक्का त्या महादेव बूक अॅप प्रकरणानं (Mahadev Book App) बसला आहे. त्यातून अनेक सेलिब्रेटींची नावं देखील समोर आले आहेत. या प्रकरणात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पासून नेहा कक्कर अशा अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. (Mumbai Police) तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी या दोन अभिनेत्यांचे नाव देखील एका अॅप प्रकरणामध्ये जोरदार चर्चेत आले होते.

आता महादेव अॅप प्रकरणाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे या अॅप प्रकरणामधील मुख्य सूत्रधार मृगांक मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मृगांक मिश्रावर 1630 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप सध्या लावण्यात आला आहे. मिश्रा रतलामचा येथील रहिवासी असून तो सध्या दुबईमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच इमिग्रेशन विभागाने त्याला पकडून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याअगोदर महादेव बुक अ‍ॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना ईडीने समन्स दिलं होतं. त्यातमध्ये आता कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनी ईडीने समन्स बजावलं असल्याची माहिती देखील समोर आली होती.

महादेव बुक या अ‍ॅपची जाहिरात करणारे इतर कलाकारांच्या अडचणीमध्ये देखील वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. तसेच महादेव अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या दुबईमध्ये पार पडलेल्या अलिशान लग्न सोहळ्यामध्ये सादरीकरण करणाऱ्या सेलिब्रेटिंना आर्थिक मोबदला मिळाल्याचा ईडीला संशय आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गडकरी’चा ट्रेलर लाँच, नितीन गडकरींचा जीवनप्रवास उलगडणार

काय आहे नेमकं प्रकरण?

महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगबद्दल (Money laundering) एका भव्य लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडिया आला होता. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नसोहळ्यामधील होता. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी असल्याचे देखील समोर आले आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे.

यामध्ये टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे. महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube