जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू

जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू

Dr. B.R. Ambedkar Jayanti : राज्यात सर्वत्र भीम जयंतीचा उत्सव सुरु असताना विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) पूर्व संध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मिरवणूक संपवून घरी परत जात असताना इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरार पूर्व कारगिल नगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपवून परत जात असताना लोखंडी झेंड्याचा पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये सहा जण गंभीर भाजले असून यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेने विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केली आहे अवस्था पुण्याची?

रुपेश सुर्वे (वय 30), सुमित सुध (वय 23) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर स्मित कांबळे, सत्यनारायण पंडित, उमेश कानोजिया, राहुल जगताप, रोहित गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. विरार पूर्व कारगिल नगरमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री साडे दहा वाजता मिरवणूक संपल्यानंतर परत जात असताना हात गाड्यावर लावलेला लोखंडी झेंड्याचा रस्त्याच्या बाजूच्या विजेच्या ट्रान्सफर्माला स्पर्श झाला. त्यामुळं स्फोट होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube