मोठी बातमी! गळ्यात भगवे गमछे, CSMT परिसरात चोरी; मराठा आंदोलन बदनाम करण्याचा डाव?

Manoj Jarange Patil Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरु केलेल्या उपोषणाला आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने जरांगे यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली असून आजपासून पाणी त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या आंदोलनाची (Mumbai) धग अधिक वाढण्याची शक्यता आहे.
धक्कादायक घटना समोर
दरम्यान, आंदोलनाच्या गर्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोर्ट परिसरातील दादाजी स्ट्रीट येथे काही आंदोलक तरुणांनी कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर दुकानातील काही कपडे आणि तब्बल 6 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Breaking : 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप! दिल्ली हादरली, अफगाणिस्तानात मृतांचा आकडा 9 वर
आंदोलनाला गालबोट?
या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतकेच नव्हे, तर तक्रारदाराने ही बाब सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर टाकून थेट मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांना टॅग करून लक्ष वेधले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समाजाकडून मोठा लोकसमर्थन मिळत आहे, असं असताना काही टवाळखोर तरुणांच्या अशा कृतीमुळे आंदोलनाला गालबोट लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सप्टेंबरची धमाकेदार सुरुवात! पहिल्याच दिवशी अनेक राशींवर धनलाभाचा वर्षाव, घ्या जाणून…
वाहतूक मार्गात बदल
आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वाढत्या गर्दीचा विचार करून मुंबई वाहतूक पोलिसांनी काही मार्ग बदलले आहेत. सीएसएमटी आणि पालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणारे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देण्यात आली आहे.