‘लालबागचा राजा’ मंडळाकडून छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान : मराठा क्रांती मोर्चाची पोलिसांत धाव
मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केला असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने पोलिसांत धाव घेतली आहे. शिव अनुयायांचा अवमान केल्याप्रकरणी या मंडळाविरोधात गुन्हा दाखल अशी मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मुंबई मराठा क्रांती मोर्चाने पत्र लिहून केली आहे. (Maratha Kranti Morcha’s demand to file a case against lalbagcha raja mitra mandal for Chhatrapati Shivaji Maharaj’s rajmudra Insult)
काय म्हंटले आहे पत्रात?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा ह्या पाठचा नेमका हेतू काय होता? हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा ‘लालबागच्या राजा’च्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे. लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव देव्हाऱ्यात आहेत.
‘आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पप्पांना प्रश्न विचारावा’; खा. शिंदेंचा खोचक टोला
त्यामुळे ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायी पहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे. कृपया आपण संबधित गोष्टीची खात्री करून ‘लालबागचा राजा’ मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा. यात देवाला किंवा धर्माला विरोध नाही, हे लक्षात घ्यावे, असे सविस्तर पत्र मराठा क्रांती मोर्चाने लिहिले आहे.
सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम
शिवराज्याभिषेक देखाव्यात लालबागचा राजा :
मुंबईतील लालबागचा राजा हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपती बाप्पाची ओळख आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येत असतात. यंदा ‘लालबागचा राजा’साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे. यात शिवराजमुद्रा पायाच्या जवळ दाखविण्यात आली आहे.