माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी आहे. माता रमाई यांची ७ फेब्रुवारी रोजी जयंती असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करुन माता रमाई यांचे स्मरण करतात असेही निवेदनात म्हटले आहे.

समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेच्या मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नवीन पिढीला मार्गदर्शक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य सरकारने निर्णय घ्यावा.

याबाबतची विनंती करताना संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई याची जयंती दरवर्षी साजरी करण्यात यावी अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube