अनेक वर्ष फक्त बोर्ड, मोदींच्या एका बैठक अन् दूर झाले अडथळे; फडणवीसांनी सांगितला नवी मुंबई विमानतळ निर्मितीचा प्रवास
Navi Mumbai International Airport चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी फडणवीसांनी विमानतळ निर्मितीचा प्रवास सांगितला.

Modi inaugurates Navi Mumbai International Airport; Devendra Fadnavis on journey of airport construction and traffic start: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या विमानतळामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. या विमानतळामुळे मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. तसेच या विमानतळाची खासियत सांगितली आहे. तसेच त्यांनी डिसेंबरपासून या विमानतळावरून वाहतूक सुरू होणार असल्याचं देखील सांगितलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण गेले दहा वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो. त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आज लोकार्पीत होत आहेत. हा एअरपोर्ट कशाप्रकारे नवभारताचं प्रतीक आहे. या एअरपोर्टची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती. अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की, या ठिकाणी नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार पण काहीच पुढे जायचं नाही.
मोदीजींच्या एका मीटिंगने निर्मिती सुरू झाली
ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं. आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की, आपलं जे प्रगती आहे. ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात. त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं. आपल्याला आश्चर्य वाटेल मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर दहा वर्ष मागील दहा वर्षांमध्ये ज्या एनओसी होत्या त्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या. पण त्या मिळत नव्हत्या. मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक त्या दिवशी घेतली. त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एनओसी आलेल्या आहेत आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एनसी का नाही? त्याला एक महिन्याची नोटीस होती ती निघालेली होती पंधरावे दिवशी आठवी एनओसी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंग ने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली आणि हा अतिशय सुंदर असा एअरपोर्ट नऊ कोटी पॅसेंजर हॅण्डल करू शकेल असा एअरपोर्ट एक इंजिनिअरिंग मार्बल देखील आहे.
सुरेखा जाधवर यांना नवदुर्गा आदर्श माता पुरस्कार प्रदान, आमदार टिळेकर यांच्या हस्ते सन्मान
हा केवळ एअरपोर्ट नाहीये तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असे म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातल्या मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र कुठे जाणार आहे आणि आपण बघा एअरपोर्ट होण्याचे आधीच मोदीजींच्या नेतृत्वात अटल सेतू तयार झालाय आणि आता तर हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सी मध्ये बसून ऑफ इंडिया ला आपल्याला जाता येईल कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या एअरपोर्ट या ठिकाणी केली आहे.
दुसरा महत्त्वाचा जो आपला प्रकल्प आहे आपली चाळीस किलोमीटरची अंडरग्राउंड मेट्रो ही मेट्रो देखील मोदीजींच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या अडथळे पार पाडत गेली मला अभिमान आहे देशातली सगळ्यात मोठी अंडरग्राउंड मेट्रो ही मुंबईमध्ये आपण तयार करू शकलो आणि कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी केली पण ही करत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं वेगवेगळे अडथळे तर आलेत पण ग्रीन ट्रॅव्हल हायकोर्ट सुप्रीम कोर्टिशन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आम्ही तिचं काम पूर्ण करू शकलो याचं कारण या प्रत्येक क्षणाला माननीय मोदीजी आमच्या पाठीशी होते प्रत्येक क्षणाला केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभा होतो.
याच सोबत खरं म्हणजे आज एक असून तिसरं स्वप्न आपलं पूर्ण होत आहे मोदीजींनी आपल्याला आदेश दिला होता की ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा इंटिग्रेशन झालं पाहिजे तोपर्यंत सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एका तिकिटावर आणि एका प्लॅटफॉर्मवर येत नाही. तोपर्यंत सोल्युशन मिळत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना फायदा होत नाही. या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते लॉन्च करतोय या ॲपवर मेट्रो असेल मोनो असेल बस असेल वॉटर टॅक्सी असेल समर्पण रेल्वे असेल सगळ्यां करता आता एकच तिकीट असेल एका तिकिटावर आपल्याला सगळीकडे प्रवास करता येईल. अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही आपण जिथे उभा होतो आपल्या घरापर्यंत पोहोचण्या करता जे जे करावे लागेल त्याकरता एका ॲपवर आपल्याला त्याचा ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल आणि त्याचा तिकीट देखील एका अँप वर आपल्याला या ठिकाणी मिळेल मुंबईला सुलभ बनवण्याकरता आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने आई सोबत घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच दर्शन! पाहा फोटो
या सोबत चौथा कार्यक्रम जो आपण या ठिकाणी करतो आहोत. मोदीजींनी जे आमच्या तरुणाई करता स्किल विकसित करण्याकरता कौशल विकासाचा कार्यक्रम हातात घेतला महाराष्ट्राच्या कौशल विकास मंत्रालयाने अतिशय सुंदर अशी स्टेपची योजना चालू केली आणि जे इमारतीत क्षेत्र आहेत अगदी आमचे एअरपोर्ट असेल किंवा वेगवेगळे इमर्जिन क्षेत्र असतील या क्षेत्रांमध्ये आताच्या संधी येतात. या संधी तात्काळ आमच्या तरुणाईला मिळाल्या याकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस हे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हजारो हजारो हातांना काम मिळेल आणि त्यातलं आमचा कौशल भारत आमचा कौशल महाराष्ट्र कुशल महाराष्ट्र आम्ही तयार करू शकू.