Mumbai : काय सांगता! इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भलामोठा अजगर, लोकं हादरले…
Mumbai : एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मोठा अजगर चढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेतला आहे.
कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ
वृत्तसंस्थेच्या माहितीनूसार, मुंबईतील प्राणीमित्र सूरज शाहा यांना घाटकोपरमधील एका इमारतीच्या छतावर भारतीय रॉक अजगर दिसला होता. या इमारतीच्या छतावर बांधकाम सुरु असल्याने हा अजगर सिमेंटमध्ये फसला होता. अजगराला अशा परिस्थितीत पाहिल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आल्याचं सूरज शाहा यांनी सांगितलयं.
मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट! ठाकरेंच्या मुलाखतीवर बानवकुळेंचा टोला
रेस्क्यू केलेला हा अजगर संरक्षित वन्यजीव प्रजातीमधील असून अजगराला वाचवण्यासाठी मुंबई वन अधिकारी राकेश भोईर यांचं पथक घटनास्थळी पोहचलं होतं. त्यानंतर शाहा यांनी सांगितलं की, अजगर पाहिल्यानंतर कोणीही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला नाही, ही चांगली गोष्ट आहे. प्राणी मित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे लोकांना कळले की सापांना इजा करणे किंवा मारणे बेकायदेशीर असल्याचं ते म्हणाले आहेत.
MwKA1PlY5CE
या संपूर्ण घटनेमध्ये एकच प्रश्न अनेकांना पडला होता तो म्हणजे हा अजगर रहिवासी भागातील इमारतीच्या 13 व्या मजल्यावर पोहचलाच कसा? तर पावसांच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरल्याने आसरा घेण्यासाठी सापांसारखे प्राणी घरात शिरतात. पाण्यापासून वाचण्यासाठीच हा अजगर इमारतीच्या छतावर गेला असेल? अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.