लोक ओरडत होते… तो सपासप चाकूचे वार करत होता

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (5)

मुंबई : शहरातील ग्रॉंट रोड परिसरात (Mumbai Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

भरदुपारी माथेफिरी खुलेआम चाकूने शेजाऱ्यांवर सपासप वार करत होता. जो दिसेल त्यावर हल्ला करत होता. मुंबईतली वर्दळीचे ठिकाण असलेल्या ग्रॉंट रोड डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

डीबी मार्ग पोलीस ठाणेच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये आरोपी चेतन गाला (वय 54) याने हे धक्कादायक कृत्य केले आहे. सगळी घटना होत असताना खाली बघ्यांची गर्दीतील एकाने सगली घटना मोबाईलमध्ये शूट केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी चेतन गालाची बायको 2 मुली आणि मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. शेजाऱ्यांनी बायकोचं डोकं भडकवल्याचा चेतनला संशय होता. सततच्या भांडणांना कंटाळून घर सोडल्याचे बायकोचं म्हणणं होतं.

राहुल गांधींना झालेली शिक्षा चुकीची, वकील सरोदेंनी सांगितली घटनेतील तरतुद

जखमींना रिलायन्स हॉस्पिटल आणि नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us