मुंबईत मुसळधार पाऊस पण बीएमसीकडून पाणीकपातीची घोषणा

मुंबईत मुसळधार पाऊस पण बीएमसीकडून पाणीकपातीची घोषणा

Water Cut in Mumbai : मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तसेच पुढील तीन चार दिवस दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याची पाहायला मिळाली. एकीकडे मुंबईत धो-धो पाऊस पडत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेने मात्र पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. महापालिकेने 1 जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. (mumbai-rain alert BMC 10 percent water cut from 1st July)

Nashik : शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का! ठाकरेंच्या गोटात उत्साहाचं वातावरण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या फक्त सात टक्के पाणीसाठा आहे. यातून मुंबईकरांना पुढील 26 दिवसांसाठी पाणीपुवठा केला जाऊ शकतो. बुधवारच्या आकडेवारीनुसार मुंबईतील सातही तलावांमधील पाणीसाठा 7.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2022 मध्ये, 28 जून रोजी हा पाणीसाठा 9.04 टक्के होता, तर 2021 मध्ये सुमारे 16.88 टक्के होता. गतवर्षी जूनमध्ये पाण्याची पातळी 20 टक्क्यांच्या खाली आल्यानंतर महापालिकेने मुंबईत 15 टक्के पाणीकपात जाहीर केली होती. यानंतर आता यंदाही महापालिकेकडून 1 जुलैपासून पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वाद चिघळला, संभाजी ब्रिगेड आक्रमक

मुंबई पाण्यासाठी मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या धरणांवर अवलंबून आहे. या धरणांमधून मुंबईला रोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र यावेली मान्सून लांबल्यामुळे या धरणांचा साठा कमी झाला आहे. या धरणांमध्ये सध्या फक्त 100873 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता काही काळासाठी का होईना पण मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मु्ंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईमधील विविध भागात पाऊस सुरु आहेच. त्याचबरोबर पुढच्या दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यास पाणीकपातीचं मुंबईकरांवर आलेलं संकट टाळलं जाऊ शकतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube