Mumbai Rain : मुंबईकरांची उकाड्यातून सुटका! मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पाऊस…
Mumbai Rain : गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारताच्या किनापट्टी भागातील हवामानात बदल झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाला सुरु आहे.
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
मुंबईसह पालघरमध्ये पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. तसेच वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा कोसबाड कृषी हवामान केंद्राचा अंदाज आहे.
लोकसभेपूर्वी PM मोदींचा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक: 70 हजार तरुणांना नोकरीतील नियुक्तीपत्र
दरम्यान, पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मुंबईकर सध्या पहिल्या पावसाचा आनंद घेत आहेत. चक्रीवादळामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा उसळत असल्याचं दिसून येत आहे.
तर बिपरजॉय चक्रीवादळ जसं-जसं गुजरातकडे सरकतंय, तसं-तसा पाऊस जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्येही पावसाची तुफान बॅटींगला सुरु असून आत्तापर्यंत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं आहे.
उद्या 15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात सरकारही सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.