सर्वाधिक श्रीमंत BMCतून वर्षभरात गायब झाले 7 हजार ‘चमचे’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 14T181914.180

Mumbai Corporation :  मुंबई महापालिकेचे बजेट हे जगभरातील कित्येक देशांपेक्षा अधिक आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील एक श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. सध्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एक फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपण आजपर्यंत मोबईल चोरणारे, पाकिट चोरणारे यांच्याविषयी ऐकले असेल पण मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एका फलकामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे गेले आहे. आपण कधी ताट, चमचे, ग्लास चोरणारे लोक पाहिले आहेत का, या फलकामुळे आता त्याची चर्चा सुरु झाली आहे. उपहारगृहातील भांडी घेऊन जाऊ नका, असे या फलकावर लिहण्यात आले आहे.

संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती, असं म्हणणाऱ्यांनी काय केलं? दानवेंचा फडणवीसांना सवाल

पालिकेतील अनेक कर्मचारी व अधिकारी लोक आपल्या कार्यालयातच जेवण मागवतात. पण जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडी कार्यालयात तशीच राहतात. त्यानंतर अधिकारी घरी गेल्यानंतर तेथील जेवणाची ताटं व चमचे चोरीला जातात. आत्तापर्यंत हजारो भांडी चोरीला गेली आहेत. यावरुन मुंबई महापालिका मुख्यालयात एक सूचना फलक लावण्यात आले आहे.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

यामुळे कंत्राटदाराचे आत्तापर्यंत 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयात भांडी व चमचे घरी घेऊन जाऊन नका, असा फलकच लावण्यात आला आहे. आत्तापर्यंत 6 ते 7 हजार चमचे, 150 ते 200 लंच प्लेट, 300 ते 400 नाश्ता प्लेट, 100 ते 150 ग्लास प्लेट एवढी भांडी चोरीला गेल्याचे या फलकावर म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube