फक्त श्रेय घेण्यासाठी जो-तो जरांगेंना भेटतोय, सरकारकडून मराठ्यांच्या प्रश्नांना विलंब; नारायण राणेंचा घरचा आहेर
Narayan Rane-मनोज जरांगे पाटील हे भर उन्हात आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी भर उन्हात बसायला नको होते. तसेच सरकारने परवानगी द्यायला नको होती.
Narayan Rane On Maratha Reservation: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी आंतरवली सराटीमध्ये आंदोलन सुरू केले आहे. जरांगे हे भर उन्हात आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ प्रयत्न करत आहे. शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार प्रसाद लाड हे जरांगे यांच्याबरोबर गेल्या दोन दिवसांपासून चर्चा करत आहे. परंतु आंदोलनाबाबत तोडगा निघत नाही. त्यातच आता भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Video : ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, अंडे फेकले कपडे फाटले चोर-चोरच्या घोषणा…
राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे भर उन्हात आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी भर उन्हात बसायला नको होते. तसेच सरकारने परवानगी द्यायला नको होती. सरकार मराठ्यांच्या प्रश्नांना नेहमीच विलंब करते. कुणबी आणि मराठा वेगळे आहे. फक्त श्रेय घेण्यासाठी जो तो जातोय, जरांगेंना भेटतोय. त्यांचे म्हणणे काय आहे, त्याच्या पुढे जा आणि मराठ्यांना आरक्षण द्या.
पुण्यातील विषारी मृत्यू तांडवाचं भिवंडी कनेक्शन; तुकाराम मुंढेंचा थेट प्रहार, ‘मिथेनॉल’चे घबाड जप्त
मराठे आणि कुणबीत फरक
मराठे आणि कुणबी फरक आहे. मराठ्यांना कुणबी करावे याला माझा विरोध आहे. जरांगेंनी सरसकट शब्द काढावा. कुणब्यांना कुठल्याही कॅटगरीतून आरक्षण द्यावे, असे नारायण राणे यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. जो-तो श्रेय घेण्यासाठीच मनोज जरांगे यांना भेटत आहे. मराठे या राज्यात 32 टक्के आहेत. त्यांचा प्रश्न अगोदर हाताळला पाहिजे, अशी गरजही राणे यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार सातत्याने सकारात्मक-देवेंद्र फडणवीस
या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अडचणीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारने निर्णय घेतले असून भविष्यातही समाजहिताचे निर्णय घेण्याची भूमिका कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचं सरकार कोणत्याही एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात उभं करण्याचं काम करत नाही. सर्व समाजांचा समतोल राखत सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार सरकार करत आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार सातत्याने सकारात्मक असून त्यासंदर्भातील भूमिका वेळोवेळी स्पष्टपणे मांडली गेली असल्याचं त्यांनी नमूद केलं.