खासदार अमोल कोल्हे पण म्हणतायत संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील काही दाखल्यांसह संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण पुरतं ढवळून निघालंय. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
त्यानंतर आता अभिनेता आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील काही दाखले आणि संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात आणि समर्थनात दोन्हीकडून वाद प्रतिवाद सुरु आहेत.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इतिहासातील काही दाखले देत संभाजी महाराज हे धर्मवीर होते असा कोणताही पुरावा समकालीन इतिहासात उपलब्ध नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते, हे त्या त्या काळातील इतिहासावरून स्पष्ट होतं, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांच्या काळातील इतिहास सांगताना समकालीन इतिहासाचा संदर्भ दिलाय. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि हीच बिरुदावली व्यापक असल्याचे त्यांनी म्हटलेय.
त्या काळातील इतिहासात, बखरीमध्ये संभाजी महाराज यांचा इतिहास लिहिताना इतिहासकारांनी देव, देश आणि धर्म हे स्वराज्य होते, आणि त्यातच संभाजी महाराज यांनी आपले शौर्यही गाजवले आहे त्यामुळेच संभाजीराजे हे धर्मवीर नव्हे तर ते स्वराज्यरक्षकच होते असा दावा त्यांनी केला आहे. त्याबरोबरच संभाजी महाराज यांचा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या इतिहासावर धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असचं चित्र त्यावेळीही रेखाटले असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.