नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

  • Written By: Published:
नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

Supriya Sule on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन मंजूर आहे. मनी लॉंड्रिग गुन्ह्यात मलिक हे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच मलिक यांच्या जामीनावर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (NCP mp Supriya-Sule-on-Nawab-Malik-bail-granted)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला ही आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Sana Khan Murder Case : सना खान हत्येतील आरोपी जेरबंद! कशी केली हत्या? आरोपीकडून कबुली

मलिक यांच्या जामीनानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. या दोघांनी यावरून सरकारवर आरोप केले आहेत. सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात असल्याचा आरोपही देशमुखांनी केला.

कारागृहातून बाहेर येणारे नवाब मलिक कोणत्या पवारांची साथ देणार?

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही देशमुखांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मलिक यांना जामीन मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाल्याचे देशमुख म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube