पीडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं; सोमय्या प्रकरणी नीलम गोऱ्हेंचे आवाहन
Kirit Somaiya Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे अक्षेपार्हय व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणाचे आज विधीमंडळात देखील पडसाद उमटले. या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास होण्यासाठी पीडित महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं, असं अवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी उपसभापती यांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरावरून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.
यावर बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं- मुली आणि बाकीची कुटुंब असते. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना बंधन सर्व माध्यमांनी गंभीरतेने पाळावे.
Opposition Meeting : आता ही लढाई ‘INDIA’ विरुद्ध ‘NDA’, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं…
पोलिसांचा तपास होईल त्यावेळी मिळणारी माहिती देखील माध्यमांनी काही मर्यादा पाळावी. पेनड्राईव्ह मला मिळाला आहे. त्यावरती आवश्यक कार्यवाही केली जाईल. हा व्हिडिओ संबंधीत चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवला जाईल. या मधील महिलेची तक्रार आवश्यक आहे असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
विरोधकांनी INDIA नाव का निवडलं?, जाणून घ्या राजकीय गणितं अन् अर्थ
सभागृहातील चर्चा संबंधीत महिला मध्यामामधून ऐकत असेल तर तिला याद्वारे आश्वस्थ करण्यात येते की तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात. ते ऐकून अनेक पीडित महिलांनी मला, फडणवीसांना संपर्क केला आहे. लोकांना अजूनही सभागृहावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. यासाठी सर्वांनी हा महिलांचा या सभाग्रहावरील विश्वास दृढ होईल असे वर्तन ठेवणे आवश्यक आहे. या प्रकारांना मध्ये गृहमंत्र्यांनी जी चौकशी जाहीर केली आहे त्यामध्ये नक्कीच सत्य बाहेर येईल असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.