BEST : हेडफोन न लावता गाणे ऐकता? होऊ शकते 5 हजारांच्या दंडासह जेलवारी

BEST : हेडफोन न लावता गाणे ऐकता? होऊ शकते 5 हजारांच्या दंडासह जेलवारी

New Rule For Mobile in BEST : सार्वजनिक ठिकाणी असताना किंवा प्रवास करताना आपल्याला अनेकदा सहप्रवाश्यांच्या मोबाईलचा प्रचंड त्रास होत असतो. तर बरेचदा आपल्या फोनमुळे मोठ्या आवाजाात लावलेल्या गाण्यांमुळे इतरांनाही त्रास होत असतो. आताा मात्र यावर नवा नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार तुम्ही बसमधून प्रवास करताना जर मोठ्या आवाजात गाणे ऐकत असाल तर तुम्हाला 5 हजारांचा दंड आणि 3 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

ST Bus : आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार

वाढत ध्वनी प्रदुषण आणि गोंगाटाच्या पार्श्वभुमीवर BEST म्हणजेच बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट (BEST) ने हा नियम जारी केला आहे. बेस्टने मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहिल्यास किंवा गाणे वाजवण्यावर या आठवड्यापासून बंदी घातली आहे. नवीन नियम वरून जनजागृती करण्यासाठी अधिसूचना करण्यात आली आहे.

प्रवासात मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहिल्यास किंवा गाणे वाजवण्याने इतर सहप्रवाश्यांना त्रास होतो. बस कर्मचाऱ्यांना कामामध्ये अडथळे येतात. त्यामुळे हा त्रास आणि गोंगाट कमी करण्यासाठी BEST ने हा नियम जारी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube