Nitesh Rane: …तर संजय राऊत उद्या दिसणार नाही

Nitesh Rane: …तर संजय राऊत उद्या दिसणार नाही

मुंबई : ‘रोज सकाळी बसून आपल्या संजय राऊतच (Sanjay Raut) ऐकायला लागतंय. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांच काही घेऊन खाल्लं आहे का? त्याचा आणि शिवसेनेचा (Shiv Sena) काय संबंध आहे? शिवसेनेत आला कधी? सामनात येण्यापूर्वी लोकप्रभामध्ये काम करीत होता. त्याचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात असायचे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात देखील लिहिलेले आहे. देशाच्या केंद्रीय मंत्र्याला शिव्या देणं शोभतं का? सरकारने दिलेले त्याच संरक्षण काढा. परत दुसऱ्या ठिकाणी दिसणार नाही’, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सभागृहात संजय राऊत यांच्यावर टीका केली.

‘संजय राऊत सारख्या माणसाकडून दुसरी काही अपेक्षा ठेऊ शकत नाही. हे विधीमंडळ नसतं तर तो खासदार देखील झाला नसता. थोडी लाज शिल्लक असेल तर त्याने अगोदर खासदरकीचा राजीनामा द्यावा. आमच्या प्रत्येक आमदाराच्या मतदार संघात त्याची धिंड काढली पाहिजे. अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवता कामा नये’, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

सुषमा अंधारेंनी भूमिका बदलली?

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी नेत्यांनी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखल करुन घेतला आहे. दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube