महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरातही वाढ

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरातही वाढ

मुंबई : आजपासून (दि.1) घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही भरघोस वाढ करण्यात आलीय. हा सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनात दिसून येणारंय. मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ केलीय. आता सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरांमध्ये देखील वाढ करण्यात आलीय. मुंबईमध्ये (Mumbai) दूध हे पाच रुपयांनी महागलंय.

मुंबई दूध उत्‍पादक संघानं MMPA दुधाचे नवे दर जाहीर केलंय. आता मुंबईत म्हशीचं 1 लिटर दूध विकत घेण्यासाठी आता 85 रुपये मोजावा लागणार आहेत. आतापर्यंत एक लिटर म्हशीचं दूध 80 रुपयांना मिळत होतं. हे नवीन दर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहेत.

सभागृहाचं कामकाज तहकूब करणं ही सत्ताधाऱ्यांची खेळी; रोहित पवारांची टीका

असोसिएशन पुन्हा एकदा दुधाच्या किंमतींबाबत माहिती देईल. सप्टेंबर 2022 नंतर मुंबईतील दुधाच्या दरात झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. एमएमपीएचे कार्यकारी समितीचे सदस्य सीके सिंह यांनी सांगितलं, दुभत्या जनावरांच्या खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतीची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे. या खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये गेल्या काही महिन्यात 15 ते 25 टक्के वाढ झालीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube